PM Narendra Modi Solapur Visit Today : पतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळाच्या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ज्यात सोलापूर ते हैदराबाद रोडवरील दोड्डी फाटा ते कुंभारी जाणारा रस्ता आज दिवसभर बंद राहणार आहे. 


'हे' मार्ग बंद राहणार आहे...



  • पंतप्रधान यांचा दौरा होणार असल्याने दोड्डी फाटा - दोड्डी चौक- रे नगर कुंभारी यादरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • तर कुंभारी- रे नगर- दोड्डीचौक, दोड्डी फाटा यादरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

  • या मार्गावरील वाहने तांदूळवाडी - मुस्ती- धोत्री, वडगाव, दिंडूर, वळसंगमार्गे पथक्रमण करतील. शिवाय वेळप्रसंगी दिंडूर वडगाव धोत्री, मुस्ती तांदूळवाडीमार्गे पथक्रमण करतील.

  • तर, पोलिस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व परवानगी दिलेल्या वाहनांना हे आदेश लागू राहणार नाही.


पर्यायी मार्ग...



  • सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे वीटभट्टी ते रे नगर रस्ता, आण्णा मोटार्स ते रे नगर जाणारा रस्ता, टोल नाका ते रे नगर जाणारा रस्ता या ठिकाणांहून वाहन पार्किंग ठिकाणी नागरिकांना पोहचता येणार आहे.

  • शिवाय सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव, दोड्डी फाटा, दोड्डी चौक, धोत्रीमार्गे वाहने पार्किंग ठिकाणी पार्क करून सभास्थळी पोहोचता येणार आहे.

  • त्याचप्रमाणे व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या कारणास्तव दोड्डी फाटा ते कुंभारी रस्ता 19 जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • कुंभारी ते दोड्डी फाटा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पुढे सर्व नागरिकांसाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त... 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी सोलापूरला येणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह सत्ताधारी भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे अनेक मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रमास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष पथकाकडून देखील कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. तर, दिल्लीतील अनेक पोलीस अधिकारी देखील बंदोबस्तासाठी कार्यक्रम स्थळी पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर; देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार