इंजिनिअरिंगमध्ये तीनदा नापास झाला, पुण्यातील तरुणानं राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी मारली, अन्..

Pune News: घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Pune News

1/8
सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या नैराश्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत होत असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली.
2/8
पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
3/8
मात्र, पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेली तत्परता आणि तातडीने रेस्क्यू ऑपरेशनमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
4/8
ही घटना सोमवारी सकाळी घडली. पार्थ लोहिया असं या तरुणाचं नाव असून, तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
5/8
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पार्थ याला सलग तीन वेळा परीक्षेत नापास झाल्याने नैराश्य आले होते. यामुळेच त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
6/8
राजाराम पुलावरून नदीत उडी घेतल्यानंतर काही क्षणातच ही माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. तत्काळ कृती करत अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात उतरून पार्थला सुखरूप बाहेर काढले.
7/8
घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
8/8
इंजिनिअरिंगच्या परीक्षेत तीन वेळा आलेल्या अपयशामुळे पार्थने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
Sponsored Links by Taboola