पंढरपूर : उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू देऊ नये म्हणतात मात्र सध्या द्यायचे थोडे आणि वाजवायचे जास्त अशी जगाची रीत सुरु आहे. हे सुरू असताना जालना (Jalna) येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा एकदा विठुरायाला तब्बल 55 लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले. संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय बारीक कलाकुसर केलेले आणि त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे 82 तोळे वजनाचे आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी देवाला सोन्याचा पोशाख करताना त्याचे खांदयावर घोंगडी हातात सोन्याची काठी असा गुराखी रूपातील कृष्णाचा अवतार केला जात असतो. मात्र विठुरायाच्या खजिन्यात सोन्याची घोंगडी नसल्याने आजवर लोकरीची घोंगडी या पोशाखात देवाच्या खांद्यावर दिली जात असे. आता या महिला भक्ताने दिलेली ही हिरेजडित सोन्याची घोंगडी जरुषन रूपातील पोशाखात वापरली जाणार असून देवाच्या खजिन्यात अजून एका मौल्यवान दागिन्यांची भर पडली आहे. आज या महिला भक्ताच्या साधकांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आणून ही सोन्याची घोंगडी अर्पण केली.
मोहिनी एकादशीला याच भक्ताने अर्पण केले होते दोन किलो वजनाचे सोन्याचे धोतर
एकाच भक्ताकडून तिसऱ्यांदा मंदिरास असे दान मिळत आहे . यापूर्वी जालनाच्या यांच महिला गेल्यावर्षी मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकाने विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर,तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने अर्पण केले होते . यानंतर याच महिला भाविकाने वसंत पंचमी दिवशी 1 कोटी 80 लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते.
प्रजासत्ताकदिनी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी देवाला अर्पण
आज पुन्हा याच महिला भक्ताकडून प्रजासत्ताकदिनी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी देवाला अर्पण केली आहे. प्रत्येक वेळेला आपले नाव गुप्त ठेवण्याची अट या भाविकांनी ठेवली होती. अगदी मंदिर समितीचा सत्कार देखील स्वीकारायला या महिला भाविक समोर आल्या नाहीत . जालना येथील दत्त मंदिरात या महिला संतांचे मोठे काम असून त्यांचे हजारो अनुयायी असल्याचे समजते.
हे ही वाचा :
Pandharpur: विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून पुन्हा गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने अथवा वस्तू गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा