सोलापूर:  सोलापूरच्या (Solapur)  कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली. सोलापूरच्या बाजारात आज जवळपास 1500 गाडी कांद्याची आवक झाली. बुधवारी बाजार समिती बंद राहिल्याने तसंच उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी असल्याने आवक वाढल्याचं समजतं. दरम्यान आवक वाढल्याने कांद्याचे दर प्रति क्विंटर 200 रुपयांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे कोथिंबीरीला भाव नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली  आहे.  सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हा प्रकार घडला आहे.


आवक वाढल्याने दर 200 रुपये प्रती क्विंटल ने घसरले, मंगळवारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रती किलो इतका होता भाव, आज मात्र कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका आहे भाव काल कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता. मात्र आज कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1200  रुपये इतका भाव आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं तर बदलत्या वातावरणमुळे आवक वाढत असल्याची प्रतिक्रिया  व्यापाऱ्यांनी दिली आहे.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ 


सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करण्याचा  प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी  हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत आणले आहे . प्रशासकीय इमारती समोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांची सरकार आणि बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज झालेले सौदे रद्द करत पुन्हा नव्याने सौदे करण्याची शेतकऱ्यांची मागणी केली आहे. 


कष्टाने पिकवलेली कोथिंबीर कवडीमोल दराने


कांद्याबरोबरच  कोथिंबीरीला भाव नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर  रस्त्यावर फेकली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार आहे. कष्टाने पिकवलेली कोथिंबीर कवडीमोल दराने जातं असल्याने गाडी भाड्याचे खर्च देखील निघत नाही. बाजारात आणलेल्या कोथिंबीरीपैकी निम्म्या कोथिंबीरला अवघे एक रुपये प्रति पेंडी दर तर निम्मी कोथिंबीर व्यापारी विकत घ्यायला देखील तयार नाहीत. उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली तर लोकांना मोफत देखील वाटली. कोथिंबीरप्रमाणे मेथी भाजीला देखील अवघे एक रुपये प्रति पेंडी भाव, शासनाने तोडगा काढावा अन्यथा गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केला आहे. 



 


हे ही वाचा :


भारतात सर्वाधिक बाजरीचं उत्पादन कोणत्या राज्यात होते? बाजरीच्या मागणीत देशात वाढ