पंढरपूर : 'नाही घडविला नाही बैसविला' अशा शब्दात विठुरायाचे (Vitthal temple) वर्णन संतांनी केले आहे. आता त्याच विठुरायाच्या राऊळीचे 700 वर्षांपूर्वीचे रुप देण्याच्या विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झालीये. त्यामुळे आता ग्यानबा तुकारामांच्या काळातील राऊळी पुन्हा भाविकांना पाहायला मिळणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात  मंदिर मजबुतीकरणास (Development Work) सुरुवात करण्यात आलीये.  विठ्ठल भक्तांना आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारने आता 73 कोटींऐवजी 150 कोटीच्या खर्चाला मंजूरी दिलीये. यामध्ये  दर्शन रांग , दर्शन रांग , स्कायवॉक अशा कामांचा देखील अंतर्भाव या आराखड्यात केला जाईल. 


विठ्ठल मंदिराच्या बाहेरील बाजूने दगडांना पडलेल्या भेगा बुजविण्याच्या कामास आता सुरुवात झाली.  यामध्ये पूर्वीच्या काळी जसे चुना , गूळ , कडधान्य , मेथ्या असे पदार्थ मिसळून त्याने बांधकाम केले जायचे त्याच पुरातन पद्धतीने बांधकामाला मजबुतीकरण देण्यात येणार आहे. ही माहिती  या कामाचे अभियंता ऋषिकेश पाटील यांनी दिली. सध्य या मंदिराच्या बाहेरील बाजूस हिरवी जाळी लावून या कामासा सुरुवात झाली.  मंदिराला पुरातन रूप देताना यासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार वापरण्यात येत आहे .मंदिराच्या आतील बाजूस देखील मोठ्या प्रमाणात मजबुतीकरणाचे काम असून  ठिकाणाची दगडे निसटली आहेत, त्याचे देखील काम सुरु आहे. त्याच पद्धतीच्या दगडांचा वापर करुन मंदिराला मूळ रुप दिले जाईल. 


150 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी


मंदिर समितीने मूळ बनविलेला आराखडा 150 कोटींचा होता. पण शासनाने मात्र सुरुवातीला फक्त 73 कोटी 80 लाखाच्या आराखड्यास निधी दिला. त्यामुळे  नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेत या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते .  यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी नागपूर अधिवेशनात मंदिर आराखड्याला पूर्ण निधी देण्याची मागणी केल्यावर यासाठी 150 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली होती. 


पूर्वीच्या आराखड्यात प्रत्येक कामासाठी किती रुपयांचा तरतूद?


मंदिर विकास आराखडा - 73.92 कोटी 
दर्शन रांग , दर्शन मंडप आणि स्कायवॉक - 51.92 कोटी
जुना दर्शन मंडप पाडून प्रशासकीय इमारत , अग्निशामक यंत्रणा , पार्किंग व बैठक हॉल - 20 कोटी
महावितरण विद्युत प्रणाली सुधारणा - 6 कोटी 
आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवणे - 2 कोटी 


 आता संपूर्ण आराखड्यास मंजुरी मिळाल्याने सर्व कामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात होईल . यामध्ये विठ्ठल मंदिराचे शिखर देखील जुने झाल्याने तेथेही पडून त्याच पद्धतीचे बांधकाम करावे लागणार असल्याचे मंदिर समिती  आराखड्यात दर्शन रांगेचा समावेश केल्याने आता भाविकांना कायम स्वरूपी बांधीव सुसज्ज दर्शन रांगेतून दर्शनासाठी जात येणार आहे . यामुळे भाविकांचा दर्शन रांगेतील त्रास संपेल असेही  बालाजी पुदलवाड यांनी सांगितले . व्यवस्थापक बालाजी पुदलवाड  यांनी सांगितले .


संपूर्ण कायापालट होणार


हे संपूर्ण काम पूर्ण होण्यास किमान 2 वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देण्यात आलीये. याशिवाय  मंदिरातील संपूर्ण फ्लोरिंग बदलणे , शिखराची डागडुजी , जुन्या पद्धतीचे नामदेव महाद्वार उभारणी , विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील हानिकारक मार्बल हटवून त्याला मूळ दगडी रूपात आणणे अशी कामे केली जाणार आहेत . पुढील चार ते पाच वर्षात मंदिराला संतांच्या काळातील पुरातन रूप मिळणार असले तरी दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करताना तिरुपतीच्या धर्तीवर व्यवस्था उभारल्यास भाविकांना ३० ते ४० तास दर्शन रांगेत घालविण्याची वेळ येणार नाही .तसेच लाखो रुपये खर्चून उभारलेल्या 7 माजली दर्शन मंडप पडून नव्याने खर्च करण्यापेक्षा याचाच वापर अन्य कारणासाठी करता येणे शक्य आहे का याचीही पडताळणी शासनाने स्थापत्य तज्ज्ञांकडून करून घेणे गरजेचे आहे . 


हेही वाचा : 


मी कृषीमंत्री झालो आणि पहिली फाईल...शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा