Pandharpur Accident: पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur News) ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. करकम्ब परिसरात (Pandharpur Karkamb News) ऊसतोड कामगारांना‌ घेऊन‌ जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात (Ujani Canal) पडला. या अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळत आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.


ऊसतोड मजुरांना (Sugarcane Workers) ऊसाच्या फडात घेऊन जात असताना ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन ऊसतोड मजूर महिलांसह दोन‌ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (13 डिसेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. पंढरपूर जवळच्या करकम्ब परिसरात हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. घटनेनंतर पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकम्ब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच, अपघातासाठी दोषी कोण यांचाही पोलिसांकडून कसून शोध सरू आहे. 


कसा घडला अपघात? 


पंढरपूर तालुक्यातून एक ट्रॅक्टर मध्य प्रदेशातील ऊसतोड कामगारांना घेऊन जात होता. पंढरपूर तालुक्यातील करकम्ब परिसरातून जात असताना ट्रॅक्टर कालव्यात पडला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर कालव्यात पडला. या भयंकर घटनेत तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अपघातातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tiktok Star Santosh Munde Death: महावितरणच्या गलथान कारभारामुळे टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार