Tiktok Star Santosh Munde Death: बीड जिल्ह्यातल्या (Beed District) धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावचा टिकटॉक (TikTok) स्टार असलेल्या संतोष मुंडे (Santosh Munde) याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आणि गावकरी आक्रमक झाले आहेत. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका भोगलवाडीच्या गावकऱ्यांनी घेतली आहे. संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता आणि इंस्टाग्रामवर देखील त्याला लाखो फॉलॉवर्स आहेत. मात्र त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे हे दोघेजण जनावर घेऊन शेतात जात असताना विजेच्या रोहित राजवळ गेलेल्या जनावरांना परत आणण्यासाठी गेलेल्या बाबुराव मुंडे यांना उघडे असलेल्या डीपी चा शॉक लागला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या संतोष मुंडेचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोगलवाडी येथील विद्युत डीपी चे अनेक केबल उघडे असून तक्रार करून देखील याची दुरुस्ती होत नाही आणि याच केबालचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
महावितरणच्या आगलथाण कारभारामुळेच या दोघांचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
लाखो चाहत्यांना खळखळून हसवणारा संतोष मुंडे कोण?
टिकटॉक स्टार म्हटलं की, संतोष मुंडे. संतोषनं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गावरान बाज आणि अस्सल गावरान साज यांचा मेळ संतोषच्या टिकटॉक व्हिडीओंमध्ये चाहत्यांना पाहयला मिळायचा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोषनं आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. संतोष गावरान स्टाईलमधील हटके व्हिडीओंसाठी ओळखला जायचा. टिकटॉकनंतर संतोषनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अल्पावधीतच तो लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या: