Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये (Pandharpur) रेल्वेने (Railway) चार जणांना धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्युमुखी पडले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे (Bihar) असल्याचं कळतं. आज (3 ऑगस्ट) पहाटे ही दुर्घटना घडली.


पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरुन जाणाऱ्या चार बिहारी मजुरांना रेल्वेने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यापैकी एकाची उपचारादरम्यान प्राणज्येत मालवली. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


Railway Accident: कपलिंग तुटल्याने रेल्वेचे दोन भाग; अर्धा भाग एका गावात तर अर्धा दुसऱ्या गावात


रुळावरुन जाणाऱ्या मजुरांना रेल्वेने उडवल्याचा संशय
हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही. 


रुळाजवळ दारुच्या बाटल्या सापडल्या
दरम्यान रुळाजवळ  दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.


Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये मालगाडीने चौघांना चिरडलं



यवतमाळमध्ये भांबराजा टोल नाक्यावरील अपघातात महिलेचा मृत्यू
तिकडे पंढरपूरपासून सुमारे साडेपाचशे किमी अंतरावर असलेल्या यवतमाळमध्ये टोलनाक्यावर रिक्षाला झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. भांब (राजा ) टोलनाक्यावर रिक्षाला झालेल्या अपघातात ललिता प्रकाश जाधव (वय 35 वर्षे, वेणी बुद्रुक) या महिलेचा मृत्यू झाला. ही रिक्षा महागाव इथून यवतमाळकडे जात होती. ऑटो आणि दुचाकीसाठी असलेल्या मार्ग सोडून रिक्षाचालकाने टोलनाक्यावरील चुकीच्या रोमध्ये रिक्षा टाकल्याने आत बसलेल्या महिला धक्का लागून ती खाली पडली. यानंतर रिक्षाचे चाक त्या महिलेच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रिक्षाचालक विलास राऊत (वय 50 वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिवरी येथील टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.