Railway Accident: पुरंदर तालुक्यातील नीरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे पिंपरेत राहिला. तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंजिनाचा भाग माघारी आणून या दोन्ही रेल्वेचे भाग जोडले. 


यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वेचं किंवा स्थानिक लोकांच झालं नाही. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅटिक ब्रेक लागुन जागेवर उभे राहिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी झाला नाही. मात्र अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने रेल्वे विभागाकडून याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.


मालवाहू रेल्वे असल्याने हानी नाही


पुरंदर तालुक्यातील नीरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले होते. मालगाडी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोन्ही भाग वेगळे झाल्याने या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली होती. ही मालगाडी पुण्याहून पुरंदर तालुक्यात येत होती. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर रेल्वे प्रशासननाने ताताडीने पुढे गेलेला इंजिनचा भाग मागे आणला आणि रेल्वेला जोडला. 


रेल्वे प्रशासनाला आवाहन
अनेकदा रेल्वेचे अपघात होतात. रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याने झालेल्या अपघाताचं प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपुर्वीच मुंबईतील हार्बर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला गाड्यांची पाहणी करण्याचं आवाहन नागरिकांनी केलं आहे. निरांमध्ये घडलेल्या घटनेत काही डबे मागे राहिले होते सुदैवाने मालगाडी होती. प्रवाशांची गाडी असती तर मोठा अपघात झाला असता, असं नागरीकांकडून बोललं जात आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वेची योग्यरित्या पाहणी करा. काही तांत्रिक बिघाड असेल तर त्यांनी दुरुस्ती करावा मात्र नागरीकांच्या जीवाशी खेळू नका, असंही नागरीकांनी म्हटलंय.