Millet Production : अलीकडच्या काळात दिवसेंदिवस भरड धान्याच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. कारण बाजरीत (Millet) विविध प्रकारची पोषक तत्व असतात. आजकाल देशभरात बाजरीबाबत बरीच चर्चा आहे. देशातील विविध कार्यक्रमांमध्ये भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ लोकांना दिले जात आहेत. याशिवाय 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (Millet Year) म्हणून साजरे करण्यात आले. त्यामुळं देशातील शेतकरी आणि लोकांमध्ये भरडधान्य लागवडीकडे आकर्षण वाढत आहे. भरड धान्य म्हणजेच बाजरी आता भारतात श्री अन्न म्हणूनही ओळखली जाते. मात्र, तुम्हाला देशात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात होतं, याबाबत माहिती आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 


बाजरी उत्पादनात राजस्थान आघाडीवर 


बाजरीच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राजस्थान आघाडीवर आहे. बाजरीच्या लागवडीसाठी येथील हवामान आणि माती खूपच चांगली आहे. त्यामुळे बाजरीचे सर्वाधिक उत्पादन राजस्थानमध्ये होते. कृषी राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण बाजरीचे 28.6 टक्के उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये होते.


बाजरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे


गव्हाच्या पिठाच्या रोट्या आपल्या सर्वांच्या घरांमध्ये बनवल्या जातात. परंतू असे बरेच लोक आहेत ज्यांना बाजरीच्या पिठाच्या रोट्या खायला आवडतात. बाजरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणूनच डॉक्टरही आरोग्यदायी आहारात बाजरी वापरण्याचा सल्ला देतात. तसेच, बाजरीची किंमत जास्त नाही, म्हणून आपण ते सहजपणे वापरू शकता. बहुतेक घरांमध्ये लोक बाजरी वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. तुम्हाला हवे असल्यास बाजरीची खिचडी, रोटी, चीला किंवा हलवा बनवून खाऊ शकता.


जनावरांसाठी चारा म्हणूनही बाजरीचा वापर 


बाजरी हे असे भरड धान्य आहे. ते फक्त 60 ते 100 दिवसांच्या कालावधीत पिकते. कोरड्या भागातही हे पीक सहज घेता येते. मोती बाजरी सूक्ष्म पोषक आणि अत्यावश्यक अमीनो अॅसिडने समृद्ध आहे. त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळून आल्याने ते जनावरांसाठी चारा म्हणूनही बाजरीचा वापर केला जातो.
भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे. देशातील जनतेमध्ये आणखी तृणधान्याविषयी जागरूकता वाढण्याची गरज आहे. तृणधान्ये शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर आहेत. ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही. लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Health Benefits of Millet : आपल्या आरोग्यात तृणधान्याचे महत्व काय? जाणून घ्या फायदे