पंढरपूर : विठ्ठल नगरी पंढरपुरात (Pandharpur) पंढरपुरात (No entry for all party MLAs MP ministers in Pandharpur) आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच (Maratha Reservation) प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदार विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल.विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.


मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदार राज्यात संवेदनशील होऊन गेला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत चालला आहे. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून अनेक जिल्ह्यात सर्वपक्षीय नो एन्ट्री सुरु झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत. 


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील  हिंगणगादे गावातील ग्रामस्थनी शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. 


मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार


मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतर कोणतीच कारवाई न झाल्याने आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, म्हणून उपोषण सोडलं होतं. आज पुन्हा साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रूपांतर करत आहे, आता या उपोषणात पाणी आणि औषध उपचार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


आंदोलन शांततेत करा, आत्महत्या करू नका


दरम्यान, गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, उग्र आंदोलन करू नका, शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे. सरकार आमच्या वेदना समजेल,अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करत आहे, सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.


इतर महत्वाच्या बातम्या