Dharishsheel Mohite Patil on Babandada Shinde : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशातच राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच माढा विधानसभा मतदारसंघात (Madha Vidhansabha Election) देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dharishsheel Mohite Patil) यांनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babandada Shinde) यांच्यावर टीका केली आहे. तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही अशी टीका मोहिते पाटील यांनी आमदार शिंदेंवर केली आहे. 


नेमकं काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील?


माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये  प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अरण येथील सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये खासदार मोहिते पाटील यांनी आमदार शिंदे यांच्यावर तुफानी शेरेबाजी केली. तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही. त्याचबरोबर मतदारसंघात महिलांना प्रचार करताना दमदाटी होते अशी एक चिठ्ठी धैर्यशील मोहिते पाटील यांना दिली होती. यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात, तलवारी काढा आणि सापससूप करून टाका असेही मोहिते पाटील म्हणाले. सीना माढा उपसा 


17 तारखेला शरद पवार यांच्या सभेचं आयोजन 


सिंचन योजना ही शरद पवार साहेबांनी आणली होती. ती काय फक्त तुम्ही आणली नाही असा टोला  धैर्यशील मोहिते पाटील यांनी लागवला होता. सध्या माढ्यात अभिजीत पाटील विरुद्ध रणजीत शिंदे ही लढत दिवसेंदिवस टोकदार बनत चालली आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी येत्या 17 तारखेला थेट शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण गरम करण्याचं काम अभिजीत पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करत आहेत.


माढा मतदारसंघात तिरंगी लढत


दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभिजीत पाटील तर अजित पवार गटाकून मिनल साठे निवडणूक लढवत आहेत. सर्वांनीच मतदारसंगात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. त्यामुळं दिवसेंदिवस माढा विधानसभेची लढत ही रंगतदार बनत चालली आहे.