सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Elections 2024) धामधुमीत सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार आणि शहर मध्यमधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांच्या बापूजीनगर येथील घरावर काही तरूणांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केला आहे. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी प्रचारासाठी घराबाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्या बापूजीनगर येथील घरावर दगडफेक केली. आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी ॲड. अनिल वासम यांना याबाबत माहिती कळवली. अनिल वासम यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या युवकांचा गोंधळ सुरू होता. वासम आणि अन्य काही जणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  


कठोर कारवाईची मागणी 


दरम्यान, आडम मास्तर हे सध्या महाविकास आघाडीतून बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप आडम मास्तरांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, दगडफेक करीत गोंधळ घालणारे कार्यकर्ते हे विरोधक असावेत. दारू पिऊन गोंधळ घालणे, विटांनी मारणे असे प्रकार सुरू होते. त्यांना रोखत असताना ॲड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Baba Siddique Death Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता, पोलिसांच्या डोळ्यांसमोर असूनही..... तपासात खळबळजनक खुलासा


RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक