NCP Candidate List Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress) उमेदवारांच्या नावाची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 45 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काही मतदारसंघात सस्पेंन्स कायम ठेवला आहे. यामध्ये माढा, मोहोळ, परांडा तसेच पंढरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची घोषणाच केली नाही. यामध्ये माढा, मोहोळ, परांडा तसेच पंढरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याचा पेच कायम आहे. कारण या चाहरी मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं उमेदवारीचा तिढा कायम आहे. त्यामुळं या सर्व मतदारसंघात चर्चा करुनच उमेदवारी घोषीत करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पुढच्या एक ते दोन दिवसात उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. 


माढा विधानसभा मतदारसंघ कोण कोण इच्छुक?


माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत . यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, तसेच अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे यांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार उमेदवारीचा माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


पंढरपूरमधून भरीरथ भालके की प्रशांत परिचारक?


पंढरपूर-मंगळवेढा मतदारंसघातून देखील अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडून प्रशांत परिचारक यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळं शरद पवार नेमकी उमेदवारी कोणाला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


मोहोळ मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक


मोहोळ विधानसभा मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक आहे. यामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, संजय क्षीरसागर, तसेच रमेश कदम हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळं पवार कोणाला तिकीट देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


परांड्यात शिवसेना ठाकरेंनी उमेदवार दिला पण...


परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार राहुल मोटे यांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून या ठिकाणची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. ठाकरे गटानं याठिकाणी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, ही जागेवर उमेदवार बदलण्यात येण्याची शक्यता आहेय. ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. याठिकाणाहून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.  


महत्वाच्या बातम्या:


शरद पवार गटाची उमेदवारी मलाच मिळेल, रणजित शिंदेंचा दावा, माढा विधानसभेसाठी भरले दोन अर्ज