पंढरपूर:  मृत्यूनंतर सर्व सुख दुःख संपतात म्हणतात मात्र पंढरपूरमध्ये (Pandharpur News)  मात्र मृत्यूनंतर ही परवड संपत नसल्याचा धक्कादायक प्रकार वारंवार समोर येऊ लागले आहेत. यातून आज सकाळी राख सवडायला आलेल्या कुटुंबीयांना या प्रकारामुळे दुःख आणि संताप अशा भावनेतून (Thieves dig graveyards  for gold)  राख न सावडताच परत फिरायला लागले. अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्यानं ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  


पंढरपुराच एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी होतो. मात्र, अत्यंविधी झाल्यानंतर  दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी गेल्यानंतर राखेसह अस्थी चोरल्या जात आहेत.  आतापर्यंत अनेक वेळा असे प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. बहुजन समाजात मृत्यूनंतर मृतांच्या अंगावर सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिन्यांसह अंत्यसंस्कार करायची पद्धत आहे. अंत्यसंस्कारानंतर या राखेत असणारे सोने मिळविण्यासाठी काही चोरटे या अस्थीच चोरून नेत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे . 
 
बुधवारी सकाळी रखमाबाई देवकर यांच्या अस्थी सावडायला कुटुंबीय मोठ्या संख्येने पंढरपूर स्मशानभूमीत पोहचले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या. अस्थी नसल्याचे दिसताच धक्का बसला. स्मशान भूमीतून मृत व्यक्तीच्या अस्थी गायब झाल्याने रखुमाबाई देवकर यांच्या  नातेवाईकांनी टाहो फोडला.  विशेष म्हणजे  राख चोरीला जात असल्याने मृत व्यक्तींच्या अंगावरील सोन्याच्या हव्यासापोटी हे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.


मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने गेले याचे दुःख वाटत नाही मात्र,राखेसह थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींच्या अस्थी या दशक्रिया विधीसाठी लागत असतात मात्र सोन्यासाठी थेट अस्थीच चोरल्या जात असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात आहे. मृत्यूनंतरही अहवेलना झाल्याने नातेवाईक संतप्त झाले असून  नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . स्मशानभूमीत सीसीटीव्ही नसल्याने असे धक्कादायक प्रकार घडत  आहे. नगरपालिकेचा गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे . 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


काय सांगता? केवळ 6 सेकंदात इथे उभारला जातो मंडप; सोलापूरच्या शेटफळ यात्रेतील अनोखी परंपरा