Ujani Dam News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. काल संध्यकाळी सहा ते आज सकाळी 6 पर्यंत मागच्या 12 तासात उजनी धरणातील पाणीसाठ्या 4 टीएमसीची वाढ झाली आहे. उजनी धरणात सध्या 1 लाख 60 हजार क्युसेक्स विसार्गाने पाणी येत आहे. धरण आज सकाळी 9 वाजेपर्यंत मृत साठ्यातून जिवंत साठ्यात प्रवेश करणार आहे. यंदा धरणाने वजा 60 टक्के एवढी इतिहासातील नीचांकी पातळी गाठली होती. गेल्या काही दिवसात धरणात 33 टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उजनी धरणात उणे 2 टक्के पाणीसाठा आहे. आज दुपारपर्यंत धरणातील पाणीसाठी प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. सध्या उजनी रणात 62.21 tmc इतका पाणीसाठा आहे. पुणे शहर (Pune Rain) परिसरात पावसामुळं हाहाकार उडाला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्हा  आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यावर्षी उजनी धरणाने वजा 60 टक्के इतकी नीचांकी पातळी गाठल्याने यंदा उजनी धरण भरणार का? हा मोठा प्रश्न बळीराजा पुढे होता. मात्र, पावसाने साथ दिल्याने अगदी 1 जूनपासून उजनी धरणात थोडे थोडे पाणी येण्यास सुरुवात झाले होते. काल सकाळी उजनी धरण वजा 14 टक्के इतक्या पातळीत आहे. आज धरण वजा 2 पातळीवर आले आहे.  


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे. मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं होतं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांना पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे. उजनी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यासाठी पुणे जिल्ह्यात देखील चांगल्या पावसाची गरज असते. कारण, पुणे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या धरणातून पाणी उजनीत सोडले जाते. त्यामुळं क्षमतेनं मोठं असणारं धरण देखील वेगाने भरते. त्यामुळं उजनी धरण लवकर भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वेगानं, कोणत्या धरणातून किती विसर्ग? शेतकऱ्यांची चिंता मिटणार