करमाळा: करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला. व्हिडीओ काॅल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या. माढ्याच्या कुर्डू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. अजित पवाराचा आणि अंजली कृष्णा यांचा व्हिडीओ काॅल व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले ... आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला.
त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात. घटनास्थळी हा प्रकार ३ तास चालू होता. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. काल दुपारी हा सर्व प्रकार घडला. अवैध मुरूम उपसा सुरू असताना आयपीएस महिला अधिकाऱ्याने तेथे धाड टाकून कारवाई सुरू केली असता अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी थेट दादांना फोन लावून दिला होता. वास्तविक ग्रामपंचायतच्या परवानगीने मुरूम उपसा होत असल्याची भूमिका ग्रामस्थांची होती, मात्र कोणतीही ग्रामपंचायत अथवा कागदपत्र सादर न झाल्याने महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई केली होती.