एक्स्प्लोर

जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार 

सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी दोन्ही राजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार केला.

Jaykumar Gore on Jayant Patil : सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी दोन्ही राजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार (Jaykumar Gore on Jayant Patil) केला. जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का? अशा शब्दात गोरे यांनी टोलेबाजी केली. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे. आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारली आहे असे गोरे म्हणाले.

मी इकडे अडकलेले असताना दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर राहून ही निवडणूक हाताळली आहे. त्यामुळं विरोधकांचे काम असते कुठे काही फट सापडती आहे का ते शोधणे.  जयंत पाटील तर कसलेले राजकारणी आहे अशी शेरेबाजी देखील गोरे यांनी केली.

रोहित पवारांचे पंढरपुरातील आंदोलन म्हणजे स्टंट आणि नौटंकी, जयकुमार गोरेंची टीका

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. सरकारचे रोहित पवारांनी अभिनंदन केले पाहिजे. पण , रोहित पवार राजकीय आंदोलन करत आहेत. हे आंदोलन म्हणजे रोहित पवारांची स्टंटबाजी आणि नौटंकी आहे अशी टीका यावेळी जयकुमार गोरे यांनी केली. रोहित पवार हे 12 जून पासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याबाबत जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले होते जयंत पाटील?

सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले) विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जंयत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही, असे पाटील म्हणाले. सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असे आवाहन  जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळं सातारकरांनो आपली ताकद दाखवून द्यावी असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राजेंना डावलल्याचा अंदाज केला व्यक्त केला. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, मंत्री जयकुमार गोरेंविरोधात केलं होतं अवमानकारक वक्तव्य
संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, मंत्री जयकुमार गोरेंविरोधात केलं होतं अवमानकारक वक्तव्य
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget