Ujani Dam Boat capsizes Update News : उजनी धरणाच्या (Ujani Dam)  जलाशयातील बोट बुडून दुर्घटना (Boat capsizes) घडली होती. या घटनेत सहापैकी पाच जणांचे मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. अद्याप एका प्रवाशाचा शोध सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाली मिळाली. पती-पत्नीसह दोन लहान चिमुकल्यांचा या मृतांमध्ये समावेश आहे.  


सहापैकी पाच मृतदेह सापडले, अद्याप एकाचा शोध सरु


उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे ), कोमल गोकूळ जाधव (वय 25 वर्षे ), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय तीन वर्षे) या संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी मिळाली आहे. पती-पत्नी आणिदोन लहान चिमुकल्यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, कुगाव गावातील अनुराग  उर्फ गोल्या ज्ञानदेव अवघडे (वय 20) या बोट चालकाचाही  मृतदेह सापडला आहे. मात्र गौरव धनंजय डोंगरे (वय 25 वर्षे) हा बेपत्ता युवक अद्याप सापडलेला नाही. एन डी आर एफचे जवान त्याचा शोध घेत आहेत.


नेमकी कशी घडली होती घटना?


इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट बुडाल्याची घटना मंगळवारी (21 मे) घडली होती. यामध्ये सहा प्रवासी बुडाले होते. तब्बल 40 तासानंतर बुडालेले सर्व प्रवाशांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. उजनी जलाशयात बुडालेली बोट 35 फूट पाण्यात तळाशी सापडली आहे.


बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला


21 मे रोजी सायंकाळी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत संपूर्ण कुटंबालाच जलसमाधी मिळाली आहे. पती पत्नीसह दोन चिमकल्यांचा यामध्ये समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उजनी अपघाताची ए टू झेड कहाणी, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?