एक्स्प्लोर

मोठी बातमी! गौतमी पाटीलच्या सोलापुरातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Gautami Patil : सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने "डिस्को दांडिया" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.  

Gautami Patil Dance : सोलापुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil)कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी (Police Permission) नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने "डिस्को दांडिया" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.

मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती. 

पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे? 

पोलिसांनी आयोजकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, "आपल्या न्युज चॅनलच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी वृंदावन गार्डन, एन आय जामगुंडी फार्म हाऊस, आसरा चौक, रेल्वे ब्रिज शेजारी, जुळे सोलापुर याठिकाणी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत डिस्को दांडीया आयोजित केले आहे. या कार्यक्रमास गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे व त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. तर, सदर कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आपला अर्ज प्राप्त झाला  असुन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सदरचे पत्र स्थानिक पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे.

मात्र, गौतमी पाटील यांच्या यापुर्वी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचा इतिहास पाहता प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असुन, गर्दी नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज वगैरे केलेच्या घटना घडलेल्या आहेत. आपला नियोजित कार्यक्रम 19 ऑक्टोबर रोजी होणार असुन सदर कालावधीत नवरात्रौत्सव चालु असतो. तर, पोलीस ठाणेकडील उपलब्ध जास्तीत जास्त मनुष्यबळ विविध ठिकाणी बंदोबस्ताकरिता वापरले जाते. तसेच नवरात्रौत्सवा दरम्यान यापुर्वीचा इतिहास पाहिले असता सन 2002 मध्ये दोन समाजामध्ये जातीय घटना घडल्याचा इतिहास आहे. त्याबाबत विजापुर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव आपल्या 19 ऑक्टोबर रोजीच्या गौतमी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील डिस्को दांडीया या कार्यक्रमास विजापुर नाका पोलीस ठाणेकडुन परवानगी नाकारण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ; खुर्च्यांची तोडफोड करत तरुणांचा धिंगाणा

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget