सोलापूर : देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईलच, पण महाराष्ट्रातही (Maharashtra double Engine Sarkar) पुन्हा डबल इंजिन सरकार सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. ते सोलापुरात (PM Modi Solapur) बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात  नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित (Solapur Ray Nagar Housing Society) कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत  आहे. 


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले होते. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात होते. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत". 


दावोसमध्ये मोदींची चर्चा 


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच दावोस दौऱ्यावरुन परत आले. यावेळी त्यांनी दावोस दौऱ्यातही मोदींचा जयजयकार असल्याचं गितलं. "मी कालच डाओसवरून परतलो. डाओसमध्ये 3 लाख 53 हजार करोडच्या करारावर सह्या झाल्यात. मला तिथे अनेक जण भेटले. सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव होतं मोदीजींचे. अनेक उद्योगपती तिथे आले होते. त्यांना गॅरंटी आहे मोदीजी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहेत. आमच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले. 


फिर एक बार मोदी सरकार और चारशे पार


एक ग्लोबल लीडर, व्हिजनरी लीडर आपल्याला मिळाले आहेत. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं, पण आज मंदिर पूर्ण होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे हाऊस होत आहेत. संपूर्ण देशात रे हाऊस व्हायला हवं असे मोदींजींनी सांगितले होते. 80 करोड लोकांना मोफत अन्न मोदीजी देत आहेत. देशातल्या लोकांनी गॅरंटी दिलीय फिर एक बार मोदी सरकार और चारशे पार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  


आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख


दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागितली आणि चूक सुधारली. 


CM Eknath Shinde speech VIDEO : एकनाथ शिंदे यांचं भाषण



संबंधित बातम्या


PM Modi Solapur Visit LIVE: अब की बार 400 पार...; सोलापुरात मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा