Agriculture News : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागात तुरळक ठिकाणा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी खरीपाच्या पिकांनी माना टाकालया सुरुवात केली. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातही पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पी व्ही सगर यांच्याकडे केली आहे. 


खरीप हंगामात पीकं पाण्याअभावी करपून जातायेत 


मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. खरीप हंगामात पेरणी केलेले मका, बाजरी, तूर, हुलगे, मटकी, सूर्यफूल, सोयाबीन यासह फळबागा पाण्याअभावी करपून जात आहेत. विहिरी आणि बोअरवेलची भूजल पातळी कमालीची घटली आहे. अनेक शेतकरी फळबागा आणि पिके जगण्यासाठी टॅंकरने पाणी घालून फळबागा आणि पिके जगवत आहेत. त्यामुळे शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.


दूध उत्पादक आर्थिक संकटात 


दुष्काळी परिस्थिती आणि कमी पावसामुळं मंगळवेढा तालुक्यात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं पशुपालकांना 4000 रुपये प्रमाणे चारा विकत घेऊन जनावरांना द्यावा लागत आहे. एका बाजूला दुधाचे रेट कमी झालेले आहेत. त्यामुळं उत्पादन खर्चा एवढासुद्धा दुधाला दर मिळत नाही. त्यामुळं दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडलेला आहे. तालुक्यातील दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी शासनाने ताबडतोब चारा डेपो सुरू करुन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा तालुक्यात शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. शेतकरी संकटात सापडल्यामुळं शासनाने आधार देऊन मदत करण्याची अत्यंत गरज आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा असे मत शिष्टमंडशाने व्यक्त केले. या शिष्टमंडळात  कृषीभूषण अंकुश पडवळे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव, मनसेचे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार, लोणारचे नेते नाथा काशीद, हिवरगाव सोसायटीचे चेअरमन हनुमंतराव मासाळ, औदुंबर वगरे, विठ्ठल कोळी, माजी सरपंच  शहाजन पटेल आदि उपस्थित होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Drought : फक्त पिकासाठी! नाशिकमध्ये पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ, शेतकरी संकटात!