एक्स्प्लोर

पंढरपूरच्या दोन विद्यार्थीनींवर काळाचा घाला, शाळेतून परतताना अपघाती मृत्यू, तालुक्यावर शोककळा 

Solapur News Update : पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झालाय. दोघींच्या मृत्यूने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Solapur News Update : पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झालाय. यातील एक घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब भागामध्ये घडली आहे तर एक घटना भोसे येथे घडली आहे. अक्षरा जमदाडे आणि राधा नवनाथ आवटे असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत. 

भोसे येथील देविदास जमदाडे यांची कन्या अक्षरा ही आज सकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेतून आपल्या घरी येत होती. यावेळी भोसे पाटी येथे अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत दहावीचा मराठीचा पेपर देऊन भावासोबत घरी जाणाऱ्या राधा हिचा गाडीवर झाड पडून जागीच मृत्यू झाला. बार्डी पाटी-करकंब येथेही दुर्दैवी  घटना घडली आहेत. एकाच दिवशी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थीनींचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   

अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. ती गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. भोसे पाटी येथे आल्यानंतर अक्षरा ज्या पीकअपमध्ये बसली होती त्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून अक्षरा ही बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर खाली पडली, यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला आहे. अक्षराच्या मृत्यूने भोसे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर दुसऱ्या घटनेत दहावीचा पेपर देऊन परतत असताना गाडीवर झाड पडून राधा या दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. 

राधा आवटे ही पेहे येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देऊन घरी परत जात होती. त्यावेळी तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं. या झाडाला नेमकी आग कशी लागली, याचा तपास यंत्रणा करत आहेत. राधा ही मुळची बादलकोटची राहणारी होती. दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा तिचा भाऊ संदीप याच्या सोबत दुचाकीवरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती. बार्डी रोड वरील एमएसईबी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं, त्यामध्ये राधाच्या डोक्याला जोराचा मार लागला. अपघातानंतर राधाला करकंब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या झाडाला आग कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप समजलं नसून पोलिस त्याबाबत अधित तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Palghar Crime News :  दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; शेजाऱ्यांसोबतच्या भांडणाच्या रागातून कृत्य 

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget