सिंधुदुर्ग : नितेश राणे आणि नारायण राणे  (Narayan Rane यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय हे अजून समजलंच नाही, त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझ्या कामाचा लेखाजोगा वाचावा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंना लगावला. नारायण राणे ज्यावेळी संसदेत बोलायला उठले त्यावेळी ते तोंडघशी पडले असंही ते म्हणाले. 


खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीवर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आम्ही 100 टक्के रणशिंग फुंकलेलं आहे. हातात मशाल घेऊन तोंडाने तुतारी फुंकण्याचे काम आघाडी करेल आणि कमीत कमी अडीच लाखाच्या मताधिक्याने लोकसभेचा उमेदवार विनायक राऊत निवडून येणार. 


भाजपच्या प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांच्यावर कोणताही निधी आणला नसल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलं असून निधीची टक्केवारी घेणाऱ्यांना फक्त टक्केवारी दिसते, निधी नाही असा टोला लगावला.  


नितेश राणे यांनी त्यांच्या माजी खासदार बंधूने गुहागरमध्ये जी गरळ ओकली ती ऐकावी, मग सापापेक्षा जहरी गरळ ओकली ते समजेल असा टोलाही राऊतांनी लगावला.  


सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणूक लढवणार आहेत, तर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही.


वैभव नाईकांचा नितेश राणेंवर हल्लाबोल 


राणेंची कुवत नसल्यानेच सिंधुदुर्गची जबाबदारी ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिली असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना लगावला.  ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन तीन मंत्री असताना, आमदार नितेश राणे यांसारखे फायरब्रँड नेते असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गचा प्रचार प्रमुख केलं जातं. तुमची कुवत नसल्याचे भाजपा नेत्यांनी ओळखले आहे. म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. 


किरण सामंत हे नारायण राणे यांच्या समर्थकांना येऊन भेटत आहेत. त्यामुळे नारायण राणे यांची जिल्ह्यातील ताकद आता कमी झाली की काय अशी आमच्या मनात शंका आहे असा टोलाही वैभव नाईकांनी लगावला. 


ही बातमी वाचा :