Sindhudurg Rain : तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. या पावसामुळं सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. यामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे.


खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, कोकणात पुढील तीन ते चार दिवस पावसाची संततधार असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र किनारी ताशी 40 ते 65 किमी वेगाने वारे वाहत असल्यानं खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी मच्छीमाऱ्यांनी जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळं अनेक मासेमारांनी सुरक्षेसाठी जवळच्या बंदरात आसरा घेतला आहे. त्यामुळं पुन्हा मासेमारीला ब्रेक लागला आहे. 


भुईमूग आणि नाचणी लागवडीला वेग


सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्यानं भुईमूग आणि नाचणी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडीला वेग दिला आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी आहहेत. बहुतांश ठिकाणी भाताच्या लागवडी पूर्ण झाल्या आहे. लागवडी पूर्ण झालेलया भाताला चांगल्या पावसाची प्रतिक्षा होती. अखेर कोकणता पुन्हा पावसानं जोर धरल्यानं शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. भात पिकासाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.


राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी


दरम्यान, विश्रांती घेतलेल्या पावसाचा राज्यात पुन्हा जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं कही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातील नांदेड, नाशिक, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून काही ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: