Sindhudurg Rain : कोकणात उघडीप दिलेल्या पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पावसानं (Hevay Rain) हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातही तुफान पाऊस झाला आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सलग पाच ते सहा तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं आंबोली घाटातील धबधबे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. घाटातील रस्यावर सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं माडखोल, तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं बांदा पोलिसांनी व्यापारी आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रात्रभर जिल्ह्यात जिल्ह्यात संततधार पाऊस पडत होता. मात्र, सकाळी पावसानं काहीशी उसंती घेतली आहे. तर आंबोलीत रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं आंबोली घाटातील धबधबे रस्त्यावरून वाहत आहेत.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर
महत्त्वाच्या बातम्या: