Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये (Kankavali) एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचललं. फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करत तरुणाने आत्महत्या (Facebook live suicide attempt) करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकाराने कणकवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


नेमकं काय घडलं?


संबंधित तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये राहतो. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह जात थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येसाठी त्याने घरातील लाकडाला दोरी बांधली आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल (9 नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा घडली. या घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक तिथे पोहोचले आणि त्याला तातडीने वाचवलं. 


या कृत्याने तरुणाची प्रकृती खालावली असल्याने त्याला त्वरित कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न कोणत्या कारणातून केला, त्याबाबतचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांच्या तपासातून ही बाब समोर येईल. 


दारुच्या नशेत पाऊल उचलल्याचा अंदाज


अत्यवस्थ अवस्थेत या तरुणाला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दारुच्या नशेत या तरुणाने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. तरुणाला वाचवल्यानंतर त्याने फेसबुकवर लाईव्ह जात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाईकांनीच पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.   


आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.  


फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचं प्रमाण वाढलं? 


दरम्यान फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. यापूर्वी राज्यासह देशभरात अशा अनेक घटना घडल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापूर्वी मागील वर्षी कल्याणमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. प्रेयसीसोबत झालेल्या वादातून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं होतं. या तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडीओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती.


संबंधित बातमी 


‘मला तुझी गरज नाही, तू मर जा’.. असं प्रेयसीने बोलताच तरुणाची फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या