Sindhudurg News: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये एकूण 45 घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवारी, रिवॉल्व्हर, सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कमेसह 30 लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींकडून पोलिसांनी काय हस्तगत केले?
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी कणकवली पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा कारने प्रवास करताना आढळला. त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी सुरू केली. त्या दरम्यान त्याच्याकडून 1 गावठी कट्टा, 3 जिवंत राऊंड, काडतूस बंदूक, 27 जिवंत काडतूसे, 5 तलवारी, 4 चार लाख 69 हजार 950 रुपयांची रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, 11 विविध कंपन्यांचे मोबाईल हेन्डसेट, 166 ग्रॅम 16 मिली वजनाचे 9 लाख 68 हजार 490 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 5 किलो 300 ग्रॅम चांदीच्या विटा आणि 3 लाख 35 हजार 844 रुपये किंमतीचे दागिने, पैसे मोजण्याची इलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची इलेक्ट्रीक मशिन, 3 ड्रिल मशीन, एक दुचाकी आणि एक चार चाकी वाहन असा एकूण 30 लाख 48 हजार 784 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात 194/ 23 कलम 3,25,4,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांकडून सुरू होता शोध
आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 गुन्हे, गोवा राज्यात 4, कर्नाटक राज्यात 24 असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याशिवाय, काही प्रकरणांमध्ये आरोपीचा चौकशी आणि इतर बाबींसाठी पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपी प्रकाश पाटील विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.
काठीने हातावर मारून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लाकडी काठीने हातावर मारून लंपास करणाऱ्या तिघा अल्पवयीन टोळीला औरंगाबादच्या (Aurangabad) मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 11 जुलै रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गेट क्रं. 56 जवळ करण्यात आली आहे. या मुलांकडून पोलिसांनी 4 लाख 30 हजार 300 रुपयांचे तब्बल 38 मोबाईल जप्त केले आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.