Sindhudurg News:   कोकणात (Kokan) मान्सूनने हुलकावणी दिल्याने कोकणातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोकणात मान्सून दाखल झाला असला तरीही जूनचा अर्धा महिना ओलांडला मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कोकणातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणीच्या क्षेत्रात घट होऊन कोकणातील शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ल्ह्याच्या काही भागांत हलक्या स्वरूपाचा मान्सून पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात खरिपाची तयारी सुरू केली होती. 


अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत नांगरणी करून ठेवली. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी शेतीचे कामे थांबली आहेत. परंतु बळीराजा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.  पाऊस लांबल्याने शेतीची कामे देखील लांबणीवर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर भात  उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना शेतीची चिंता लागून राहिली असून त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पहिली चार नक्षत्र शेतकऱ्यांना शेतीसाठी महत्वाची असतात. मात्र यामध्ये मुबलक पाऊस बरसला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 


यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आधीच बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने देखील जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले  आहे. त्यामुळे आता जर मान्सूने योग्य वेळेत हजेरी लावली नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. परंतु अद्यापही योग्य प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी वेळेवर होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.


हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचा कामे हाती घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची कामे देखील आटोपली होती. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यासमोर आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मृग नक्षत्रामध्ये पावसाला सुरुवात होते. त्यानुसार शेतकरी शेतामध्ये पेरणी करण्यास देखील सुरुवात करतात. त्यामुळे आता जर पाऊस बरसला नाही तर दुबार मशागत करण्याची वेळ देखील शेतकऱ्यांवर येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांनी  हजारो रुपये खर्च करुन पेरणासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी केली होती. मात्र पावसाची चिन्ह नसल्यामुळे ही बियाणं देखील शेतकऱ्यांच्या घरात तशीच पडून असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Farmer Suicide : मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही