Sindhudurg : मागील आठवड्यातच ऐन थंडीच्या काळात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला, राज्यातील विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यात (Marathwada) या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. यानंतर आता सिंधुदुर्गात सर्वत्र दाट धुकं पसरल्याचं चित्र दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय, जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. 


आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत, तर नागरिकांसाठी सुखद अनुभव!


सिंधुदुर्गात सर्वत्र दाट धुकं पसरल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दाट धुकं हे आंबा आणि काजूसाठी मारक आहे, कारण धुक्यातून जे दवबिंदू आंबा, काजुवर येतात. त्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. आधीच बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यात आता धुकं पडत असल्याने बागायतदार अडचणीत सापडले आहेत. मात्र दाट धुकं आणि थंडी पडत असल्याने नागरिकांना मात्र हा सुखद अनुभव आहे.


 


मागच्या वर्षी कोकणात थंडी उशीराने सुरु, आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव


मागच्या वर्षी कोकणात थंडी उशीराने सुरु झाली होती. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू  उत्पादक शेतकरी चिंतेत होते. बदलत्या वातावरणामुळं कोकणात काही ठिकाणी आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरु होती. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. यामुळं आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली होती. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम दिसत होता. त्यामुळं आंबा बागायतरांवर संकट निर्माण झालं होतं. मागच्या वर्षी थंडी किंवा वातावरण पाहता हापूसचा मोसम उशिरा होता. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली होती. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत. 


पुण्यात रात्री तापमानात घट


 पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात  उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. 


 


देशात पुढील 4 दिवस हवामान


हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीपर्यंत जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अनेक भागात बर्फवृष्टीही होईल. याशिवाय मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी 18 फेब्रुवारीला जम्मूमध्ये, 18 आणि 19 फेब्रुवारीला हिमाचलमध्ये आणि 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते.


हेही वाचा>>>


Weather Update : देशात पुन्हा थंडीचा जोर वाढणार? कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कुठे गारपिटीची शक्यता, हवामानाचे ताजे अपडेट जाणून घ्या