Hapus : सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा (climate change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील हापूस (Hapus) आंब्यावर देखील या बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. कोकणातल्या (Konkan) हापूस आंब्याचे बिघडलेलं चक्र कडाक्याच्या थंडीमुळे सुरळीत होईल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरली. आजतागायत केवळ 10 टक्के आंब्याच्या झाडांवर मोहोर आला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


15 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भारणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर न आल्यास हापूसवरती असलेलं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं अनेक बागायतदारांनी कामगारांना एक प्रकारचा अल्टीमेटमच देऊन ठेवला आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूसची अपेक्षित मोहोर प्रक्रिया न झाल्यास कामगारांना त्यांचा त्या दिवसापर्यंतचा हिशोब देऊन घरी पाठवलं जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.


कमी फळधारणा


सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानामुळे खूप कमी फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 


फवारणीसह मशागतीचा मोठा खर्च 


फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे.


10 फेब्रुवारीपर्यंत आंब्याला मोहोर आला नाही तर...


मागील 20 वर्षापासून अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. हवामान बदलाचा आंब्यावर मोठा परिणाम होत आहे. यंदा आंब्याला कमी प्रमाणात मोहोर आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 10 फेब्रुवारीपर्यंत जर आंब्याला मोहोर आला नाही तर कोकणातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत मोहोर आला तरच एप्रिलमध्ये सर्वसामान्य लोकांना आंबा खायला मिळू शकतो अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान