Gopichand Padalkar On Sharad Pawar : धनगरांना आरक्षण मिळावं म्हणून अनेकांनी लढा उभारला, अनेकांनी प्रयत्न केले पण शरद पवारांनी (Sharad Pawar) धनगरांना आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं तर ठिक नाहीतर रस्त्यावरची लढाई लढण्याचा आमचा प्लॅन बी असेल. लबाड लांडग्याच्या डोक्यात काठी घालून पुढं जायचं आहे असंही शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले. 


आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सिंधुदुर्गातील ओरोस येथे धनगर जागर यात्रेच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी भाषणातून शरद पवारांवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, धनगर समाजाच्या प्रश्नावर अनेक मंडळी प्रयत्न करत होते. त्यांनी लढा उभा केला. मात्र शरद पवारांनी धनगर समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न केले. नव्याने आम्ही आरक्षण मागत नसून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेले आरक्षण आम्ही मागत आहोत. थांबलेले आरक्षण सरकारने आम्हाला दिलं पाहिजे.  या प्रकरणी कोर्टात 170 पुरावे दिलेले आहेत. डिसेंबर अखेर आम्हाला आरक्षण मिळेल. नाहीतर रस्त्यावरची लढाई हा आमचा प्लॅन बी आहे. जेवढा अन्याय धनगर समाजावर झाला तेवढा कुठल्याही समाजावर देशात अन्याय झाला नाही. लबाड लांडग्याच्या डोक्यात काठी घालून पुढे जायचं आहे.


धनगर आरक्षण न मिळण्यासाठी बारामतीचे पवार कारणीभूत


आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "धनगर आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. धनगर आरक्षण मिळत नाही यासाठी बारामतीचे पवार कारणीभूत आहेत. पवारांनी आपल्या समाजाचा घात केला आहे. महाराष्ट्रात धनगर जात आहे, असे 2019 मध्ये फडणवीस यांनी समोर आणले. डिसेंबरमध्ये धनगर समाजाच्या बाजूने निकाल येणार आहे. धनगर समाजाने जागृत राहावे. पवारांनी एनटी हा नवा प्रवर्ग काढला. संविधानात हा प्रवर्ग आहे का? एकीकडे आमच्यापुढे पंचपक्वान्न वाढले आणि हात बांधून ठेवले. पवारांना काय अधिकार धनगर आरक्षणावर बोलण्याचा? सुप्रिया सुळे आणि रोहित पवार धनगर आंदोलनात जातात आणि त्यांचे आजोबा शरद पवार आदिवासी हक्क परिषदेत जावून बोलतात. आदिवासींमध्ये कोणालाही घुसू देणार नाही. रोहित पवारांना समजावून सांगा हा धनगर भोळाभाबडा राहिलेला नाही."


ही बातमी वाचा: