Watermelon Price : सध्या कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कारण कलिंगडाच्या दरात (Watermelon Price) मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका तळकोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. दर नसल्यामुळं कलिंगड शेतातच पडून आहेत. सध्या प्रतिकिलोला तीन ते पाच रुपयांपर्यतचा दर मिळत आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त उत्पादन देखील झालं आहे, याचा परिणाम दरांवर होत असल्याचं चित्र दिसत आहे.


Watermelon Arrival in Karnataka: गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक


तळकोकणात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दर पडल्याने सिंधुदुर्गात (Sindhudurg) शेकडो टन माल शेतात पडून आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेलं कलिंगड यामुळं दरात मोठी घसरण झाली आहे. दर नसल्यामुळं बाजारात कलिंगड नेऊन काय करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळं कलिंगड शेतातच पडून आहे. याचा मोठा आर्थिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळं भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. 


व्यापाऱ्यांची कलिंगड खरेदीकडे पाठ


कलिंगडाचे उत्पादन हे 75 ते 80 दिवसांमध्ये मिळते. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कलिंगड लागवडीतून शेतखऱ्यांना चांगला नफा मिळत असल्यानं युवा पिढी देखील कलिंगड शेतीकडे वळली आहे. मात्र, कलिंगडाचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कलिंगडाचा दर तीन ते पाच रुपयांपर्यत घसरला आहे. तरी देखील व्यापारी कलिंगड खरेदी करीत नसल्यामुळं शेतकऱ्यांचा माल शेतातच सडत आहे.


दरवर्षी कलिंगडला 12 ते 15 रुपयांचा दर मिळतो


दरवर्षी कलिंगडला 12 ते 15 रुपये किलोचा दर मिळत असतो. यावर्षी मात्र, कलिंगडाला प्रति किलोसाठी 3 ते 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे उत्पादन घेतलं जातं. गोव्यात कलिंगडाची मोठी बाजारपेठ आहेत. मात्र, कर्नाटकमधून गोवा बाजारपेठेत कलिंगडाची मोठी आवक झाली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे. दर नसल्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कलिंगड शेतातच पडून आहे. कलिंगड हे नाशिवंत असल्यामुळं शेतातचे ते सडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Maharashtra: हिंगोलीचे कलिंगड थेट काश्मीर दरबारी, 19 टन कलिंगडातून दोन लाखाचा नफा