कोल्हापूर : राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उद्यापासून सुरु करण्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच प्रमुख मंदिर संस्थानांनी आपली नियमावली तयार केली आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरही उद्यापासून सुरू होत आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिर उद्या खुली होणार आहेत. उद्यापासून भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे.


भाविकांना दर्शनासाठीची नियमावली


1.दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार
2. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार
3.मंदिराच्या आतील आवारातील दुकान बंद राहणार
4.भाविकांना कासव चौक-पितळी उंबऱ्या पासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागणार
5. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही
6. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर चा वापर करूनच प्रवेश मिळणार
7.मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही
8.मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
9. 10 वर्षा खालील लहान मुलं आणि जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही
10. आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार


शिर्डी साई दरबारी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन मिळणार, भाविकांना गर्दी न करण्याचं साई संस्थानचं आवाहन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.  तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं.


संबंधित बातम्या






Temple Reopen | सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांचा जल्लोष, पुण्यात साखर वाटप