Health Tips : दिवाळी हा एक महत्त्वाचा सण आहे जो देशभर साजरा केला जातो. दिवाळीच्या विशेष प्रसंगी लोक खाण्याबरोबरच मजा करण्यासोबत चांगल्या पदार्थांचा आनंद घेतात. यावर्षी कोरोनामुळे दिवाळीचा उत्सव थोड्या काळजीने साजरा केला पाहिजे. विशेषत: ज्यांना डायबीटीज किंवा रोग प्रतिकारशक्तीशी संबंधित कोणत्याही आजार असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेणे जरुरी आहे.


दिवाळीत बहुतेक लोकांना गोड पदार्थ खायला आवडतात. ज्यांना डायबीटीजचा त्रास आहे अशा लोकांना गोड पदार्थांपासून दूर राहणे खूप अवघड होते. तज्ज्ञांचे मते, जेव्हा त्यांच्या जवळ फक्त गोड पदार्थ असतात तेव्हा डायबीटीजच्या रुग्णांसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण दिवाळीनंतर वाढणाऱ्या डायबीटीजचे दुष्परिणाम टाळता येतील. दिवाळीच्या काळात डायबीटीज असलेली व्यक्ती किती प्रमाणात गोड खाऊ शकते हे प्रत्येकाच्या आरोग्यावर निर्भर असतं.


दिवाळीत रक्तातील साखरेची पातळी कशी संतुलित ठेवाल?




  • डायबीटीज असलेली लोकं सणासुदीच्या काळात गोड, खारट, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्टीव्हिया किंवा स्प्लेन्डासारख्या नैसर्गिक साखरेचा पर्याय सुरक्षित असू शकतो.

  • जास्त प्रमाणात मद्यपान करणे टाळा.

  • अनियमित वेळी अन्न खाणे टाळा.

  • जास्त दिवस उपवास केल्याने हायपोग्लाइसीमिया (रक्तातील साखरचे प्रमाण कमी होणे) आणि अशक्तपणा होऊ शकतो, जो डायबीटीज असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो.

  • चालणे, पोहणे, सायकल चालविणे यांसारखे व्यायाम केल्यास आपण आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकतो