एक्स्प्लोर

Pune Shivsena News: पुण्यात शिवसैनिकांनी काढली बंडखोर आमदारांची रुग्णवाहिकेमधून 'अंतयात्रा' 

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.आज हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढली.

Pune Shivsena News: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.आज हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.  

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हडपसर येथील गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्ण वाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. यावेळी बंडखोर आमदाराच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले.तर घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सूरत आणि गुवाहाटी मध्ये बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने हॉटेल मध्ये सुरक्षा पुरविली.जर तीच सुरक्षा काश्मिर मधील पंडितांना दिली असती,तर अनेक निष्पाप नागरिकाचे जीव वाचले असते. तसेच पूर परिस्थिती मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ही सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली असती.तर अनेकांचा जीव असला,मात्र हे भाजपचे केंद्रातील सरकारने त्या गोष्टीला प्राधान्य न देता,फोडाफोडीच्या राजकारणाला दिले आहे.त्या कृतीचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो.त्यामुळे जे तिकडे गेले आहेत.ते पुन्हा निवडून येणार नाहीत.पण एक सांगतो की,शिवसेना ही कार्यकर्ते,नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. हे सर्व बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवाव,असा इशारा देखील विजय देशमुख यांनी दिला.

बारामतीत शिवसैनिकांकडून संकट मोचन गणपतीला साकडं अन् महाआरती

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुबुद्धी यावी तसंच पक्षावर आलेले संकट दूर व्हावं, यासाठी बारामतीत शिवसैनिकांनी संकट मोचन गणपतीला साकडे घातले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सिद्धी गणेश मंदिर गणपतीला महाअभिषेक करून शिवसेना वाचवण्यासाठी साकडे घातले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करून नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget