एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्तारामुळे राऊत-पवार 'सामना' पुढे, पुण्यातील मुलाखत स्थगित

सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवारांमधील होणाऱ्या या कार्यक्रमाची पुणेकरांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता अनिश्चितकाळासाठी ही मुलाखत पुढे ढकलली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात रंगला जाणारा 'सामना' पुढे ढकलला आहे. 29 डिसेंबरला संजय राऊत हे शरद पवार यांची मुलाखत घेणार होते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने ही मुलाखत पुढे ढकलली आहे. ही प्रकट मुलाखत पुणे येथे होणार होती. याबाबत माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करुन दिली होती. राऊत आणि पवार यांच्या निकटचे संबंध आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यात राऊत आणि पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. सत्ता स्थापन करण्याआधी राऊत-पवार यांच्यामधील बैठकांकडे देखील राज्याचे लक्ष असायचे. त्यामुळे पवार आणि राऊत यांच्यातील या पुण्यात होणाऱ्या या प्रकट मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राऊत कोणते प्रश्न विचारणार आणि त्याला शरद पवार हे कसे उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. तसेच या मुलाखतीतून अनेक गुपिते उलगडली जाण्याची शक्यता होती. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने ही मुलाखत पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गेल्या शरद पवार यांची पुण्यातच जाहीर मुलाखत घेतली होती. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील सख्य सर्वपरिचीत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत राऊतांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. तसेच पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असं देखील राऊत म्हणाले होते. मला शरद पवारांवर अजिबात शंका नाही. भाजपच्या मुंबईतील नेत्याने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला संजय राऊतांना 25 जन्म लागतील. तसंच मी या देशातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, माननीय शरद पवार यांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील, असं राऊत म्हणाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवारांमधील होणाऱ्या या कार्यक्रमाची पुणेकरांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता अनिश्चित काळासाठी ही मुलाखत पुढे ढकलली आहे. संबंधित बातम्या- Pune | पुण्यात पवार आणि संजय राऊत यांच्यात रंगणार 'सामना', 29 डिसेंबरला राऊत घेणार मुलाखत | ABP Majha  

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
IND Squads vs NZ Tour : बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारत ‘अ’ संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad
बीसीसीआयची मोठी घोषणा! न्यूझीलंड दौऱ्यासाठी 2 टीम जाहीर, ध्रुव जुरेलकडे भारतीय संघाची धुरा, वाचा संपूर्ण Squad

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget