Sharad Pawar : शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे, आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर संवाद साधलाय,


राज ठाकरे बरेच वर्षे हे कुठं भूमिगत झाले होते


राज ठाकरे बरेच वर्षे हे कुठं भूमिगत झाले होते ते काल आले, दोनचार वर्षे भूमिगत होतात,  नंतर बाहेर येतात एखादं व्याख्यान देतात आणि परत दोन वर्षे काय करतात हे मला माहित नाही, तीस वर्षे एखादी व्यक्ती काम करत असताना त्यांच्याच नावाची मागणी केली म्हणून अजित पवार यांची निवड झाली, उत्तरप्रदेशात राज ठाकरे यांना काय दिसलं मला माहित नाही


राज ठाकरेंच्या भूमिकेत कधीच सातत्य नसंत


उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकऱ्यांची हत्या झाली, मोदींच्या संबधी ते काय काय बोलले होते, आता त्यांच्यात बदल झालेला दिसतो, आज मोदींच्या बाबतीत ते अनुकूल दिसत आहेत, पण त्यांच्या भूमिकेत कधी सातत्य नसतं.


चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला पवार यांचा टोला
आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला काय?आम्ही तिन्ही एकत्र आहोत, लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही, नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाही बद्दल जास्त प्रेम असत, एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते. कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई केली जाते हे लोकांना समजतं, याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल, जरा शहाण्या माणसाबद्दल विचारा


मुंबई महापालिका निवडणुकां संदर्भात..


मुंबई पालिकेत किती मत घेतील मला माहित नाही, पण याआधी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य आहेत असं शरद पवार म्हणाले.


साखर कारखाना संदर्भात


एकरकमी एफआरपी देणं सोपं नाही पण आता साखर कारखानदार देत आहेत, साखर विकल्याशिवाय पैसे कसे येणार, साखर एकदम कधीही विकली जात नाही.


नाहीतर पुतीन सारखं होऊन बसेल


लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधीपक्ष सक्षम असायला हवा, नाहीतर पुतीन सारखं होऊन बसेल, सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलो नाही.


ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का?


तपास यंत्रणांचा वापर आम्ही कधी केला नाही, कोल्हापूरला कधी येऊन गेले तर मी पाहुणे येऊन गेले का असं विचारतो, ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का? आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी जातात.


अशा वेळी राजकारण करायचं नाही.


युक्रेन आणि रशियात काय चाललं आहे त्यावर आपण बोलू नये, आपण भाजपचे विरोधक पण आंतरराष्ट्रीय भूमिका घेण्याची वेळ येते अशा वेळी राजकारण करायचं नाही.


ती जबाबदारी मी घेणार नाही
विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडीची जबाबदारी घेण्याची माझी इच्छा नाही ती जबाबदारी मी घेणार नाही, पण विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल तो केला जाईल, ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे त्या पक्षांने पुढे यावं, महागाई विरोधात विधिमंडळात आवाज उठवला जातोय.


स्वाभिमानी सारखी संघटना आमच्या सोबत हवी आहे
आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाचा गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर जाऊ नये अशी माझी भूमिका आहे, स्वाभिमानी सारखी संघटना आमच्या सोबत हवी आहे, केंद्र सरकारची भूमिका शेतकरी विरोधात आहे अशा वेळी स्वाभिमानी सारखी संघटना हवी, मला काही राजू शेट्टी यांचे पत्र मिळाले नाही.


किरीट सोमय्यावर टीका
किरीट सोमय्या यांचा पक्ष देखील त्यांच्याकडे किती लक्ष देतो, केवळ लक्ष वेधण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी असे केले जाते


केंद्र सरकारने नियंत्रण आणले पाहिजे


 देशात काहीतरी आर्थिक घडामोडी घडत आहेत असं ऐकायला मिळत आहे, यावर केंद्र सरकारने नियंत्रण आणले पाहिजे.


जातीयवादाबाबत बोलताना..


देशभर आपण शाहू महाराज यांचे नाव घेतो, पोटनिवडणुकीत जातीयवाद निर्माण करणाऱ्या पक्षाला पंचगंगा नदीच्या जवळ देखील येऊ देऊ नये, माझ्या आजोळची लोकं याबाबत योग्य भूमिका घेतील