Jaya Prada : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जया प्रदा (Jaya Prada) यांचा आज  60 वा वाढदिवस. जया प्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी झाला. त्यांचे खरे नाव ललिता राणी रावणम असं आहे. बालपणी जया प्रदा यांना क्लासिकल डान्सची खूप आवड होती. त्या 14 वर्षाच्या असताना शाळेत डान्स करत होत्या. त्यावेळी एका दिग्दर्शकानं त्यांना पाहिलं. तेव्हाच जया प्रदा यांना ‘भूमि कोसम’ चित्रपटामध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना त्या कामाचे दहा रूपये मानधन मिळाले होते. 


1979  मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम या चित्रपटामधून  जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा त्यांना हिंदी भाषा येत नव्हाती पण 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या कामचोर या चित्रपटामध्ये त्यांनी फ्यूअँट हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला. मवाली, तोहफा, आखिरी रास्ता, औलाद, घर-घर की कहानी, मैं तेरा दुश्मन, ऐलान-ए-जंग, जादुगर आणि आज का अर्जुन या जया प्रदा यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 


जया प्रदा यांनी 1986 मध्ये निर्माता श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा श्रीकांत यांना तीन मुलं होती. श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच जया प्रदा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीमध्ये जया प्रदा यांनी सांगितलं की, जेव्हा जया प्रदा यांनी श्रीकांत यांच्याकडे आई होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीकांत यांनी त्यांना नकार दिला. तेव्हापासून जया प्रदा आणि श्रीकांत यांनी वेगळं राहण्यास सुरूवात केली. त्यामुळे जया प्रदा या लग्न झालेलं असून देखील एकट्या राहात आहेत.  दहा रूपये मानधन घेऊन करिअरला सुरूवात करण्याऱ्या जया प्रदा या आज कोट्यवाधींच्या मालकीण आहेत. रिपोर्टनुसार जया प्रदा यांच्याकडे 180 कोटी रूपये संपत्ती आहे. तसेच   मर्सिडीज बेंज, महिंद्रा कंपनीची झायलो, फोर्ड अँडियेवर, आउटलँर, मर्सिडीज आणि ऑडी या सारख्या लग्झरी गाड्या देखील जया प्रदा यांच्याकडे आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha