एक्स्प्लोर

Nagpur : अनुसूचित जातीजमाती प्रतिबंध कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरण मार्गी लावाः ज. मो. अभ्यंकर

अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कार्यवाही करा. फिर्यादीची बाजू योग्य मांडली जात नसल्याने प्रकरणे प्रलंबित राहतात, असे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी सांगितले.

नागपूर : केंद्रीय आयोगानुसार प्रकरणाचा तपास योग्य रितीने व्हावा व प्रलंबितता कमी व्हावी यावर भर राहिला असल्याने फिर्यादीकडून योग्य माहिती घ्या. प्रकरणे तत्काळ सोडविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन निकाली काढा. त्याच बरोबर विशेष न्यायालयात प्रकरणे दाखल करा, अशा सूचना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी आढावा घेतांना केल्या.
आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे, के. आर. मेंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, पोलीस उपायुक्त तिडके तसेच पोलीस अधिकारी उपस्थित यावेळी होते.
बलात्कार, विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ आदी प्रकरणांची वेळेत कार्यवाही करा. उच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा सरकारी वकीलांनी  योग्य रितीने करावा. फिर्यादीची बाजू योग्य रितीने मांडली जात नाही त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात, असे अभ्यंकर यांनी सांगितले.
गुन्हे होऊ नये यासाठी पोलीस विभागाचा जरब गुन्हेगारावर असला पाहिजे. गुन्हेगार सुटू नये याबाबत प्रकर्षाने काळजी घ्या. समाजकल्याण विभागाने सानुग्रह अनुदानाचा निधी शंभरटक्के वाटप केल्याबद्दल आयोगाने समाधान व्यक्त केले. अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत जनतेमध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे.  राज्याच्या तुलनेत पूर्व विदर्भात क्रॉस कम्प्लेट(खोट्या तक्रारी) फार कमी आहेत याबाबत  आयोगाने समाधानकारक व्यक्त केले. आयोगाची योग्य रितीने काम होण्यासाठी सरकारी अभियोक्त्यांची संख्या वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ही आहेत प्रलंबित प्रकरणे

यावेळी जिल्ह्यातील अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये नोंद झालेल्या प्रकरणापैकी निर्गती व प्रलंबित प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षकांनी आयोगासमोर सादर केली. 2016 नूसार शहरी भागात एकूण 58 प्रकरणे असून 24 प्रकरणे प्रलंबित तर 34 नवीन प्रकरणे आहेत. यापैकी 35 प्रकरणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले तर 19 प्रकरणे प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 28  प्रकरणे असून प्रलंबित 11 व नवीन 17 आहेत.  2021 नुसार शहरी भागातील शहरी भागात एकूण 81 प्रकरणे असून 39 प्रकरणे प्रलंबित तर 42 नवीन प्रकरणे आहेत. यापैकी 46 प्रकरणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले तर 22 प्रकरणे प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 64 प्रकरणे असून प्रलंबित 21 व नवीन 43 आहेत.  यापैकी 47 प्रकरणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले तर 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालायात 213 प्रकरणे प्रलंबित असल्याची अशी माहिती देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget