एक्स्प्लोर

Satara : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल 

Satara news : सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी औंध विश्रामगृहात घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara News) खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने रविवारी जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणात सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी औंध विश्रामगृहात घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.  

तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

यावेळी फुलारी यांनी पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. दरम्यान, औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत आहेत.घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले.

नेमका प्रसंग काय घडला?

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावस पांगवले होते. यावेळी अतिरिक्त   कुमक मागवण्यात आली होती. सदर मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Kurla Phoenix Mall Mumbai News: साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुण-तरुणीला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुण-तरुणीला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
Shivendraraje Bhonsle: 'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
Embed widget