Shriniwas Patil On Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांना 40 हून अधिक आमदार शरद पवार यांना पाठिंबा दर्शवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच आता साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांची देखील राष्ट्रवादीमधील घडामोडींवर प्रतिक्रिया समोर आली आहे. "मी पवारसाहेबांसोबत होतो, आहे आणि राहिन. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण," अशा शब्दात साताऱ्याच्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. श्रीनिवास पाटील एबीपी माझाशी बोलत होते.
'माझ्या मित्राबरोबर मी कायम राहिन'
"मी पवारसाहेबांसोबत होतो, आहे आणि राहिन. प्रीतीसंगमावर आमचे गुरु विसावले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आमचे साहेब येत आहेत. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. त्यांच्याबरोबर सतत आमच्यासारखे समाजकारण, निवडणुकीपुरतं राजकारण. यापलिकडे ज्यांनी आयुष्यभर स्वर्गीय यशवंतरावांची साथ दिली. पुरोगामी धोरण स्वीकारलं. गोरगरिबांना न्याय दिला त्याच माझ्या मित्राबरोबर मी कायम राहिन, असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं.
साहेब ठरवतील ते धोरण, त्यांच्यासोबत जायचं
अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विचारलं असता श्रीनिवास पाटील म्हणाले की, "काही गोष्टी अपेक्षित होत्या, त्या झाल्या. पण समर्थपणे उभा राहणारा नेता हा परिस्थिती पालटतो. आमच्या गुरुंनीही केल्या एकेकाळी, ते आपण पाहिलं. त्यामुळे त्यांचा शिष्यही करेल असं मला वाटतं. छोट्यांना मदत करणं त्यांचं काम आहे. आयुष्यभर त्यांनी तेच केलं यापुढेही तेच करतील. जनतेच्या दारापुढे उभं राहून त्यांच्यासाठीच काही करायचं हीच त्यांची, घराण्याची परंपरा आहे. साहेब ठरवतील ते धोरण, त्यांच्यासोबत जायचं."
श्रीनिवास पाटील यांच्यासाठी भरपावसात सभा
दरम्यान 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली भरपावसातील सभा विशेष गाजली. या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पालटल्याचं म्हटलं गेलं. शरद पवार साताऱ्यात असताना, श्रीनिवास पाटील यांच्या प्रचाराच्या भाषणावेळी धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली. शरद पवारांचा पावसातील फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. एका क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि शरद पवारांचे फोटो अनेकांच्य व्हॉट्सअॅप स्टेटसवर झळकले. त्याचा परिणाम असा झाला की उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले.
हेही पाहा