Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सातारा दौऱ्याचा (Satara Visit) आज दुसरा दिवस आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 64वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येतात. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या समाधीला अभिवादन केलं.


देणगीदारांसह अजित पवारांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार


त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली. यावेळी देणगीदार रामशेठ ठाकूर शकुंतला ठाकूर यांचा सत्कार करण्यात आलं. सोबतच गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांचाही शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती मिळत आहे.


राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींनंतर पवारांचा सातारा दौरा


दरम्यान, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागलं आहे. शरद पवार सातारा दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांचा हा दौरा असला तरी राजकीय पटलावर या दौऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मागील आठवड्याभरात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. शिवाय अजित पवार देखील साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पवार काका-पुतण्या यांच्या सातारा दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 


VIDEO : Sharad Pawar at Bhaurao Patil Samadhi : कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन



शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यातील आजचे कार्यक्रम


9 मे 2023


सकाळी 08: 30 वाजता - कै.कर्मवीर भाऊराव पाटील सातारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सकाळी 8: 45-10: 30 वाजता - कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी सोहळा
सकाळी 11: 00 वाजता - रयत शिक्षण संस्था सातारा ची वार्षिक सर्वसाधारण सभा
दुपारी 12: 15 ते 12: 30 वाजता - साताऱ्याहून जकातवाडी येथे जाणार
दुपारी 1230 वाजता - भारतीय भटके-विमुक्त विकास-संशोधन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री. कुमार केतकर यांना फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार
दुपारी 03:30 वाजता - जकातवाडी हुन साताऱ्याच्या दिशेने रवाना
दुपारी 03: 55 वाजता - सातारा येथे आगमन
दुपाी 04: 00 वाजता - सातारा सैनिक स्कूल हेलिपॅड, येथे आगमन
दुपारी 04: 30 वाजता - पुन्हा बारामतीला पोहोचणार