Maharashtra Satara News : सातारा : मच्छर मारण्याचं औषध  तोंडात गेल्याने नागपुरात दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना साताऱ्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातल्या (Satara) कराड तालुक्यातील मुंडे येथील दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 


श्लोक माळी आणि तनिष्का माळी अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने दोघांनाही त्रास होत होता. यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनं मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


सातारा जिल्ह्यातील मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री श्लोक आणि तनिष्काला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर रात्री दोघांना उलट्या आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. नंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली.  प्रकृती बिघडल्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. 


मच्छर मारण्याचं औषध तोंडात गेल्याने चिमुकलीचा मृत्यू


मच्छर मारण्याचं औषध  तोंडात गेल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. रिद्धी चौधरी असे या चिमुकलीचे नाव  आहे. लहान मुलांकडून खेळताना अनेकदा पैसे किंवा खेळेण्याच्या वस्तू तोंडावाटे पोटात गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. रविवारी खेळता खेळात रिद्धीच्या हाती डास पळवण्यासाठी घरात असणारी मशीन लागली. खेळताना मशिन रिद्धीने तोंडात घातले, मशिनमधील लिक्विड तोंडात गेले. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खराब झाली. प्रकृती खराब झाल्यानंतर आई वडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान रिद्धीचा मृत्यू झाला.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jalna News: मुलानं स्वतःच्याच मित्राचा खून केल्याचं कळताच वडिलांनी सोडला जीव; जालन्यातील धक्कादायक घटना