सातारा : सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूत पार पाडत असताना सैन्याशी दोन हात करताना जखमी झालेले विपुल इंगवले (Vipul Ingwale) यांनी पुण्यामध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोरेगाव तालुक्यातील भोसे गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहील विपुल इंगवले यांच्या पश्चात पत्नी श्वेता, अवघ्या सहा महिन्यांची मुलगी, आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वी ते जखमी झाल्यामुळे ते गावीच होते. नंतर पुन्हा पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना त्यांचे दवाखान्यात निधन झाले.
सैन्य दलाकडून त्यांना शहीद घोषित करण्यात आल्याने त्यांच्यावर लष्करी इतमामात उपचार करण्यात आले. सियाचीनमध्ये जखमी झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून त्यांचा आयुष्यासाठी संघर्ष सुरू होता. त्याची प्रकृती लक्षात घेऊन पुण्याच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.