Jayant Patil : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. त्यातच महायुतीला (Mahayuti) मनसेची (MNS) साथ मिळाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. 


भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की, आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का? अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. 


जयंत पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) हे दुटप्पी भूमिका घेतात अशी सातारा टीका केली होती. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. मी उदयनराजे यांना मी सल्ला दिला असता उभे राहू नका म्हणून.आधी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही असं उत्तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे


...म्हणून शशिकांत शिंदेंना उमेदवारी 


शशिकांत शिंदे हे संसदेत 100 टक्के हजेरी लावतील. मात्र विरोधात उदयनराजे भोसले हे 5 वर्षात फक्त 6 दिवस संसदेत गेले. लोकसभेत आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते जर हजर राहत नसतील तर ते धक्कादायक आहे. पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता, 100 टक्के हजेरी लावून आणि प्रश्न विचारू शकणारा उमेदवार आम्ही दिला असल्याची खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Udayanraje Bhosale on Sharad Pawar : शरद पवारांचा नाईलाज, राज्यातील दोन-तीन जिल्ह्यात अस्तित्व राहिलं : खासदार उदयनराजे भोसले


Amol Kolhe : उदयनराजे राज्यसभेवर, शशिकांत शिंदे लोकसभेवर, सातारकरांना दोन खासदार निवडून देण्याची मोठी संधी : अमोल कोल्हे