सातारा : मी 35 वर्षापूर्वी राजकारण सुरू केलं तेव्हापासून विकास हाच फोकस ठेवला आहे, तेच आताही करत असल्याचे सातरा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. मागील जन्मात माझ्याकडून पुण्याचा काम झालं असेल, त्यामुळेच या राजघराण्यात माझा जन्म झाला. परंतु, मी घराण्याच्या नावाखाली कधीही मतदान मागितलं नाही. मी केवळ कामाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या असल्याचे ते म्हणाले. 


शरद पवारांचा नाईलाज झाला


खासदार उदयनराजे म्हणाले की, शरद पवार (Udayanraje Bhosale on Sharad Pawar) यांचा आता नाईलाज झाला आहे. कारण कोकणात, खानदेश, विदर्भात त्यांचा कुणीही प्रतिनिधी राहिलेला नाही. मराठवाड्यात देखील कोणी नाही. आता केवळ पश्चिम महाराष्ट्रात दोन-तीन जिल्ह्यात त्यांच अस्तित्व राहिला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यांनी आता माझ्या लोकसभा मतदारसंघात लक्ष घातलं आहे. इथेच त्यांच्या चार सभा झाल्या, त्यांना माझं सांगणं आहे 4 कशाला 40 सभा घा. पुरेपूर वेळेचा वापर करा, असा टोला त्यांनी लगावला. 


त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत समोर असणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार आहे, मी ओव्हर कॉन्फिडन्सनेबोलत नाही. आता लोकांनी ठरवायची वेळ आली आहे, शिष्टाचाराच्या बाजूने जायचे की भ्रष्टाचाराच्या बाजूने जायचं. लोक कायम स्थिर सरकारला पाठिंबा देत असतात. समोरच्या बाजूला आपण पाहतोय अस्थिर आहे. अजूनपर्यंत त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला नाही. महाविकास आघाडी आता पूर्णपणे अधोगतीच्या दिशेने निघाली आहे.


जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांची शरद पवारांवर टीका


व्ही.पी. सिंह यांचं सरकार असताना मंडल आयोग तुम्ही लागू केला. त्यामध्ये लिहिलं होतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना आरक्षण द्या. यांनी मात्र याचा चुकीचा अर्थ काढला. शरद पवार यांनी लोकांमध्ये तेढ निर्माण केली, वादावादी निर्माण केली तुम्हाला मतं हवी होती म्हणून तुम्ही व्यक्तीकेंद्रित झाला म्हणून तुम्ही आरक्षणाचा घोळ घातला. तुम्ही एवढ्यावरच थांबलेले नाही. 23 मार्च 1994 ला एक नोटिफिकेशन काढलं आणि तुम्ही आरक्षण देऊन टाकलं. मला सांगा तुम्हाला नेमकं काय करायचं होतं? शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही भावना मांडली. मात्र, यांनी व्यक्त केंद्रीत राजकारण करून देशाचे तुकडे करून टाकले. यांच्यामुळे आता राज्यात ओबीसी संघटना मराठा संघटना निर्माण झाल्या असं पूर्वी कधीच नव्हतं. त्यामुळेच आता यांना हद्दपार करून टाका आणि प्रत्येक दहा वर्षानं जातनिहाय जनगणना करा ज्यांची जशी संख्या आहे तसा आरक्षण देऊन टाका जे संविधानातील आहे ते पूर्ण करा. 


उद्धव ठाकरेंच्या गजनी सरकार टीकेला प्रत्युत्तर


उदयनराजे म्हणाले की, दुसऱ्यावर टीका करणं सोपं असतं. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट दाखवता त्यावेळी चार बोट आपल्याकडे असतात. तुम्ही काय केलं ते सांगा आणि मग दुसऱ्यावर टीका करा. स्वतः काही केलं नाही आणि आता दुसऱ्यावर टीका करत आहात, आता केवळ मुद्दे नाहीत म्हणून संविधान बदलणार अशी चर्चा सुरू केली आहे. कोण बदलणार संविधान? संविधानाचा नरडं कापण्याचं काम काँग्रेसने केलं. गरिबी हटाव देश बचाओ जय जवान जय किसान अंमलबजावणी का केली नाही? हे केलं नाही म्हणून लोकांनी यांना सत्तेतून बाहेर काढलं. हे सगळं कळत होतं त्यामुळे इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लागू केली.


भाजप खासदारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले? 


त्यांनी सांगितले की, हे केवळ मीडियाने कांगावा केलेली गोष्ट आहे. यांच्याकडे लोकांसमोर जाऊन मतं मागण्यासाठी मुद्दे नाहीत त्यामुळे हे असले उद्योग करत आहेत. विकासकामे यांनी केलेली नाहीत. त्यामुळे लोकांसमोर जायला अडचण येत असल्याने असे मुद्दे मांडत आहेत. केवळ स्वतःचा नाकर्तेपणा हा मुद्दा आहे 


तुम्ही स्वतः पद्मविभूषण घेऊन मोकळे झालात


उदयनराजे भोसले म्हणाले की, यशवंतराव चव्हाण तुमचे मानस पिता होते. तुम्ही स्वतः पद्मविभूषण घेऊन मोकळे झालात मग वडिलांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल उदयनराजे यांनी शरद पवारांना केला. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासंदर्भात माझं नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणं झाला आहे भारतरत्न देणारी एक बॉडी आहे, त्यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे. शरद पवारांना पद्मविभूषण मिळाला मग यशवंतराव चव्हाणांना आम्ही भारतरत्न देणारच. ते म्हणतात की तुम्हाला आत्ताच का सुचलं, अहो मला सुचलं तरी, तुमचे ते मानस पिता आहेत ना? मग तुम्हाला का ते सुचलं नाही? तुम्ही पद्मविभूषण घेऊन मोकळे झाला आणि मानस पित्याला विसरून गेलात, अशी टीका त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या