Eknath Shinde on Pratapgad : राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसून आला नसता, पण शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिनी केले. प्रतापगडावर 363 वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले यांनी दांडी मारत नाराजी व्यक्त केली.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर आज उत्साह दिला नसता, शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या. ते पुढे म्हणाले, येथील माती इतिहासाची साक्ष देते. एक आदर्श राजा म्हणून शिवरायांकडे जग पाहते. आपण 363 वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे ही मागणी होती. नियमाने व कायद्याने काम करण्याचे धाडस दाखवत नव्हते, पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय झाला. पोलिस व प्रशासनाचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले, एकही कॅबिनेट अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही. शिवरायांचे साक्ष देणारे प्रसंग पुढे नेल्याशिवाय राहणार नाही.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शिवप्रताप दिनाला उपस्थित राहणे यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी नाही. अनेक जलदुर्ग महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवरायांना आरमाराचे जनक मानले पाहिजे. मोदींनी नेव्हीच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर केला. आपण त्यांचे मावळे आहोत हे सांगायला अभिमान वाटतो. आपले गडकोट इतिहासाची साक्ष देणारे आहेत. दुर्ग प्राधिकरण स्थापन गडांचे संवर्धन करु, कोठेही पैसे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, तसेच अतिक्रमण हटवले जातील. हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या आशीवार्दाने मुख्यमंत्री झाला. 


मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!


छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रणकंदन सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोढा यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची तुलना औरंगजेबाशी केली आहे. लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले. 


मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरीकडे  त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या