Koyna Dam : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाला ओळखलं जातं. या धरणाची 105 टीएमसी पाणी क्षमता आहे. मात्र, सध्या या कोयना धरणात बोटावर मोजन्या इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील ज्या भागात सर्वाधिक पाऊसाची नोंद होते, त्या परिसरात तुरळक पाऊसाच्या नोंदी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडं जिथं तुरळक पाणी आहे, त्या ठिकाणचे मासे पाण्याविना आणि गाळामुळं तरपडून मरत आहेत.
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. पाऊस नसल्यामुळं अनेक ठिकाणी पेरण्या देखील रखडल्या आहेत शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील सर्वाधिक पाऊसाची नोंद होत असेत. त्याठिकाणी देखील तुरळक पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळं धरण साठ्यात देखील पाण्याची वाढ होताना दिसत नाही. पाण्याचा साटा कमी असल्यामुळं मासे पाण्याविना आणि गाळामुळं तडपडून मरत आहेत. त्यामुळे त्याची दुर्गंध सर्वत्र पसरली आहे.
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस
दरम्यान, जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जोर जुलैमध्ये वाढला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच कोकणात देखील चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सरतोडी भागांमध्ये शुक्रवारी रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गावकरी तसेच शाळेतील मुलांना दोरीचा आधार घेत मानवी साखळी करुन पुरातील पाण्यातून रस्ता काढत जावे लागले. धुळे शहरात काल सायंकाळी पावसाने चांगली हजेरी लावली आहे.