Udayanraje Bhosale: उदयनराजेंच्या कॉलरची सर्वांनाच भुरळ; 3 वर्षाच्या ओजसने राजेंना पाहून कॉलर उडवली अन्..., VIDEO

Udayanraje Bhosale: तीन वर्षाचा चिमुकला ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय.

Continues below advertisement

सातारा: साताऱ्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दरवेळी उदयनराजे हे आपल्या अनोख्या स्टाईलनं कायम चर्चेत राहिलेले आहेत. कधी राजकीय सडेतोड भूमिका असेल तर कधी चाहत्यांकडे पाहून त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल... यामुळे थोरांपासून अगदी लहानांपर्यंत उदयनराजेंची हटके क्रेझ कायमच सर्वांना पाहायला मिळते... साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षाचा चिरंजीव ओजस हा देखील उदयनराजेंचा चाहता आहे... ज्यावेळी उदयनराजे त्याच्या समोर आले त्यावेळी त्याने उदयनराजेंना पाहून त्याच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली आणि उदयनराजे जसे पुष्पाच्या डायलॉगवर आपल्या गालावरून हात फिरवतात तसे हात वारे केल्यामुळे उदयनराजे देखील आवाक झाले आणि त्याच्यासमोर त्यांनी हात जोडले.... यानंतर या चिमुकल्याने उदयनराजेंना  समोर ठेवलेले ड्रायफूट खायला दिले असता राजे सुद्धा ते ड्राय फ्रुट स्वतःच्या खिशात भरताना दिसत आहेत. यामुळे लहान मुलांबाबत देखील त्यांना चांगलीच आपुलकी असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.. सध्या या तीन वर्षाचा चिमुकला ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय.

Continues below advertisement

ओजसचा व्हिडीओ चर्चेत

तीन वर्षांच्या चिमुकल्या ओजसने हसत लाजत उदयनराजेंच्या कॉलरची कॉपी करून दाखवली, त्यांच्या या स्टाईलने जमलेल्या सर्वांनी त्याचं कौतुक केलं तर उदयनराजेंनी त्याच्यासमोरचं हात जोडले. उदयनराजेंना पाहून त्याच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली आणि उदयनराजे जसे पुष्पाच्या डायलॉगवर आपल्या गालावरून हात फिरवतात तसे हात वारे केल्यामुळे उदयनराजे देखील आवाक झाले आणि त्याच्यासमोर त्यांनी हात जोडले.... यानंतर या चिमुकल्याने उदयनराजेंना  समोर ठेवलेले ड्रायफूट खायला दिले असता राजे सुद्धा ते ड्राय फ्रुट स्वतःच्या खिशात भरताना दिसत आहेत. यामुळे लहान मुलांबाबत देखील त्यांना चांगलीच आपुलकी असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.. सध्या या तीन वर्षाचा चिमुकला ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय.

नेहमीच त्यांच्या हटके अंदाजासाठी चर्चेत असणारे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) 'कॉलर उडवण्याच्या' स्टाईलमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इतकी की, एकदा खुद्द शरद पवारांनीदेखील एका सभेत राजेंची कॉलर उडवत त्यांचा अंदाज कौतुकाने स्वीकारला होता. त्यानंतर आता सध्या या तीन वर्षाचा चिमुकला ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola